माजी आर्मी ऑफिसर होणार राजस्थानचा मुख्यमंत्री?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर | छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणूकांमधे काँग्रेसने चांगलीच बाजी मारत विजय मिळवला आहे. राजस्थानमधे वसुंधराराजेंच्या नेतृत्वाला शह देत काँग्रेसने मोठी मजल मारली आहे. मुख्यमंत्री पदासाठी अशोक गेहलोत यांच्याबरोबरच सचिन पायलट यांचेही नाव चर्चेत आहे. पायलट यांची राजकारणाहून आणखी एक खास ओळख आहे ती म्हणजे लेफ्टनंट सचिन पायलट.

होय. सचिन पायलट हे माजी आर्मी आॅफिसर आहेत. त्यांचे आजोबा पूर्वी आर्मीत होते. वडील राजेश पायलट हे इंडीयन एअरफोर्स मधे होते. सचिन यांना लहानपणापासूनच आर्मीत जाण्याची आवड होती. अजमेरचे खासदार असताना पायलट यांनी इंडियन आर्मीच्या एका ओरिऐंटेशन मधे सहभाग घेतला होता. तेव्हापासून त्यांना आर्मीत भरती होण्याचे वेडच लागले. त्यानुसार त्यांनी वेस्टर्न कमांड, चंदिगड येथे परिक्षा आणि मुलाखत दिली आणि उत्तीर्ण होऊन इंडियन मिलिटरी अॅकेडमीतून सैनिकी शिक्षण घेतले. आय.एम.ए. मधून बाहेर पडल्यानंतर पायलट यांनी शिख रेजिमंटच्या १२४ टेरीटोरीयल बटालियनचे लेफ्टनंट म्हणुन काम पाहीले.

परंतू वडीलांच्या अकाली निधनाने त्यांना राजकारणात प्रवेश करावा लागला आणि त्यांनी राजस्थान काँग्रेसची धूरा आपल्या हाती घेतली. सचिन पायलट सध्या टोन्क येथून आमदार असून राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष आहेत.

इतर महत्वाचे –

म्हणुन १६ डिसेंबरला “विजय दिवस” साजरा केला जातो

भारतीय नौदलाच्या या कामगिरीमुळे ७ दिवस जळत होता कराची नौदल बेस

नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero

 

Leave a Comment