सचिन पायलट- सारा अब्दुल्ला यांचा घटस्फोट? प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा

sachin and sara pilot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राजस्थान विधानसभेची रणधुमाळी सुरु असून काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन पायलट यांनी आपला घटस्फोट झाल्याचा उल्लेख आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 2018 साली त्यांनी … Read more

गहलोत अध्यक्ष तर पायलट मुख्यमंत्री?? काँग्रेसमध्ये हालचालींना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राहुल गांधी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यांनतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू असलेले अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. पण ‘एक व्यक्ती एक पद’ असे स्पष्ट मत राहुल गांधींनी मांडल्यामुळे गहलोत याना राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडावं लागण्याची शक्यता … Read more

भाजपानं सचिन तेंडुलकरशी बोलणी केली असतील, माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात धमक नाही : सचिन पायलट

Sachin Pilot CM

नवी दिल्ली वृत्तसंस्था: उत्तर प्रदेश मधले महत्त्वाचे नेते जितीन प्रसाद यांनी नुकताच काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठच आता सचिन पायलट देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना चांगलाच वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी पायलट नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनीदेखील पत्रकार परिषदे मधून आपली नाराजी व्यक्त करून दाखवली होती. त्याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेमुळे … Read more

… म्हणून केंद्र सरकारने देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे : सचिन पायलट यांचा सरकारवर निशाणा

sachin pilot

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भाजप पक्षाला केंद्रामध्ये सत्ता स्थापन करून ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र विरोधी पक्ष काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला अपयशी सरकार म्हंटले आहे. देशात महागाई ,बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपाला धारेवर धरले आहे. काँग्रेसनेते सचिन पायलट यांनी देखील ७ वर्षे पूर्ण केलेल्या भाजप सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने देशातील जनतेची … Read more

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more

राजस्थान: गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला; सचिन पायलट म्हणाले..

मुंबई । राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. राजस्थान विधानसभेतील विरोधी बाकावरील भाजपने आणलेल्या विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत आवाजी मतदान घेण्यात आलं. अशोक गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान विधानसभा अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. Chief Minister Ashok Gehlot led #Rajasthan Government wins vote of … Read more

महिन्यभरच्या तीव्र संघर्षानंतर संचित पायलट-अशोक गेहलोत यांचे मनोमिलन

जयपूर । राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या शिष्टाईमुळे काँग्रेस नेते सचिन पायलट यांचं बंड शमलं. त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. यानंतर सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. बंड शमल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पायलट हे गेहलोत यांच्या भेटीला पोहचले आहेत. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशनात काय रणनीती आखायची … Read more

अखेर सचिन पायलट यांचे बंड शमले! काँग्रेसमध्ये मिळणार मोठी जबाबदारी

नवी दिल्ली । गेल्या महिन्याभरापासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा सामना रंगला आहे. मात्र, आता हा सामना निकाली लागण्याच्या मार्गावर आहे. त्याचं कारण म्हणजे बंडखोरीनंतर सचिन पायलट हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार आहेत. सचिन पायलट यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने एक समिती गठीत … Read more

राजस्थान सत्ता संघर्ष: सचिन पायलटांनी घेतली राहुल, प्रियांका गांधींची भेट

नवी दिल्ली । राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्यानंतर पीटीआयनं वृत्त दिलं असून, सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतून सकारात्मक परिणाम दिसून येणं अपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी … Read more

अखेर काँग्रेसची मागणी मान्य! राज्यपालांनी दिले गेहलोत सरकारला अधिवेशन बोलवण्याचे आदेश

जयपूर । गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट या संघर्षता वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. विशेषतः मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यासाठी आक्रमक झालेले बघायला मिळाले. राज्यपालांनी सुरूवातील नकार दिल्यानंतर संपूर्ण काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसच्या लढ्याला अखेर यश मिळालं असून राज्यपालांनी अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अधिवेशन न घेण्याचा … Read more