जनतेने भाजप ला धडा शिकवला – सचिन पायलट

0
43
Sachin Pilot CM
Sachin Pilot CM
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत . त्यापैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताने सत्ता येईल असा विश्वास राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकींच्या निकालांचे चित्र पाहता जनतेच्या मनात भाजपा सरकारविरोधात राग होता तो आता बाहेर आला आहे असे पायलट पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

जनतेने भाजपाला धडा शिकवला आहे. काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा असल्याने आम्हाला बहुमत मिळाले अाहे. राजस्थानमध्ये मागील वर्षी आमच्याकडे फक्त २१ जागा होत्या. मात्र यंदा आम्हाला जनतेने भरभरून मतदान केले आहे. जनता भाजपच्या धोरणाला कंटाळली आहे. त्यामुळे वसुंधरा राजें सरकारविरोधात जनतेचा रोष होता. आता आमच्याकडून जनतेला अपेक्षा आहेत. अंतिम निकालापर्यंत वाट पाहू. उद्या पक्षाची बैठक असून आमचे सरकार बहुमताने सत्तेवर येईल. त्याचबरोबर राजस्थानसह तीन राज्यात आमचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यात आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून आतापर्यन्त हाती आलेल्या माहितीनुसार चारही राज्यात काँग्रेसची विजयी घोडदौड सुरु आहे. तर मिझोराममध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

राजस्थान मध्ये कॉंग्रेसचं नाही तर जनतेच सरकार - सचिन पायलट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here