जयपूर । राजस्थानात बंडाचा झेंडा फडकवून अशोक गेहलोत यांचं सरकार अडचणीत आणणारे सचिन पायलट यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं आहे. काही वेळापूर्वीच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या एका वाक्यात सचिन पायलट यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटवर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सचिन पायलट यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एका ओळीचं ट्विट करत सचिन पायलट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ”सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नही,” अशी ओळ पोस्ट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र त्याचा पराभव करता येत नाही असा ओळीचा अर्थ होतो. राजस्थानमध्ये बंडखोरी केलेले सचिन पायलट आता नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।
— Sachin Pilot (@SachinPilot) July 14, 2020
दरम्यान, आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर रणदीप सूरजेवाला यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या १०२ आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”