हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी ने छापे मारल्या नंतर भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. भाजप फक्त सूडबुद्धीने ही कारवाई करत आहे असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जातोय. ईडीने केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केले आहेत.
विरोध पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर होत आहे. २०१४ पासून केंद्रातील सरकारने ईडी, सीबीआय, आयकर या संस्थांचा विरोधी पक्षांच्या विरोधात गैरवापर केलेला आहे. विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी या संस्थांचा वापर केला जात आहे.महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची सुरुवात आहे. भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांवर हेच स्पष्ट होत आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई विरोधी पक्षांचे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप, आरएसएसच्या इशाऱ्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. ज्यांनी टॉप्स सीक्युरिटी कंपनीला कंत्राट दिले त्या भाजप नेत्यांची चौकशी ईडी का करत नाही, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
सदर कंत्राट २०१४-१५ ला टॉप सिक्युरिटी ला मिळाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस जी
MMRDA चे अध्यक्ष कोण होते? देवेंद्र फडणवीस जी! मग सदर कंत्राट कसे दिले गेले? याचे उत्तर कोणी दिले पाहिजे? देवेंद्र फडणवीस यांनी-
पाच वर्ष भाजपा गप्प का बसली ? https://t.co/JPhkJJrBwo— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 27, 2020
सचिन सावंत यांनी फडणवीस यांना केले हे सवाल –
1) सदर कंत्राट २०१४-१५ ला टॉप सिक्युरिटी ला मिळाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री कोण होते?
2) देवेंद्र फडणवीस MMRDA चे अध्यक्ष कोण होते?
3) मग हे कंत्राट कसे दिले गेले? याचे उत्तर कोणी दिले पाहिजे? देवेंद्र फडणवीस यांनी ना.
4) देवेंद्र फडणवीस पाच वर्ष गप्प का बसले ?
९ कंपन्यांना काम देण्यात आले, ६ पैकी १ टॉप्स सिक्युरिटी आहे. १५ कोटींचे काम विभागून दिले जातं. किरीट सोमय्या खोटं बोलत आहेत. MMRDA ने कंत्राट दिलं, हे कंत्राट आधीच्या सरकारच्या काळात देण्यात आलं, याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं पाहिजे. जर लाच घेतली गेली असं वाटतं असेल तर पाच वर्षांत चौकशी का केली नाही, असा थेट सवाल सचिव सावंत यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’