वाढदिवशी सचिनने चाहत्यांना केलं हे कळकळीचे आवाहन; म्हणाला की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेणाऱ्या सचिनचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे जगभरातून सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. याच चाहत्यांचे आभार मानण्यासाठी सचिनने 1 विडिओ शेअर केला आणि चाहत्यांप्रति आभार व्यक्त केले. यावेळी सचिनने कोरोना परिस्थितीवरून चाहत्यांना काळजी घेण्याचे आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.

मागचा महिना माझ्यासाठी आव्हानात्मक होता. मला कोव्हिड पॉझिटिव्ह आढळलो. मी 21 दिवस सर्वांपासून  तुमच्या सर्वांच्या, माझ्या कुटुंबीयांच्या तसंच मित्रांच्या शुभेच्छा आणि प्रार्थना माझ्यासोबत होत्या. माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ यांनी सर्वांनी मी बरा होण्यासाठी मदत केली. तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.” असं सचिन सुरुवातीला म्हणाला.

मला एक डॉक्टरांनी सांगितलेला मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. मी मागच्या वर्षी प्लाझ्मा डोनेशन सेंटरचं उद्घाटन केलं.  प्लाझ्मा जर योग्यवेळी मिळाला तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. मी योग्य वेळी प्लाझ्मा (Plasma) दान करणार आहे. माझं याबाबत डॉक्टरांशी बोलणं झालं आहे. तुमच्यापैकी जे कुणी Covid 19 मधून बरे झाले आहेत, त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करावी आणि जेंव्हा शक्य असेल तेंव्हा प्लीज प्लाझ्मा दान करावे. त्यामुळे बराच त्रास कमी होईल. हा त्रास काय असतो ते तुम्हाला माहिती आहे. त्याचा तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना आणि  मित्रांही त्रास होतो, तो त्रास कमी व्हावा यासाठी प्लीज प्लाझ्मा दान करा’ असं आवाहन सचिननं केलं आहे.

Leave a Comment