हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sachin Tendulkar : आजच्याच दिवशी 15 वर्षांपूर्वी क्रिकेट विश्वात असा विक्रम केला गेला होता, जो आजही कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही. होय भारताचा माजी फलंदाज असलेल्या सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा पार केला होता. 29 जून 2007 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सचिनने हा पल्ला गाठला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांच्या जादुई आकड्याला स्पर्श करणारा सचिन हा जगातील एकमेव खेळाडू आहे. तूर्तास तरी सचिनचा हा विक्रम कोणी मोडेल असे वाटत नाही.
आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत Sachin Tendulkar ने अनेक विक्रमांची नोंद केली. त्यापैकी हा एक विक्रम आहे. हे जाणून घ्या कि, सचिनने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.83 च्या सरासरीने एकूण 18,426 धावा केल्या आहेत. नाबाद 200 ही एकदिवसीय सामन्यांतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत सचिनने 49 शतके आणि 96 अर्धशतके झळकावली आहेत. 2013 मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.
श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज असलेला कुमार संगकारा Sachin Tendulkar चा 15 हजार धावांचा आकडा गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. 2015 मध्ये निवृत्त झालेल्या संगकाराने 404 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41.99 च्या सरासरीने 14,234 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 25 शतके आणि 93 अर्धशतकांचा समावेश आहे.
सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये फक्त विराट कोहलीच वनडेमध्ये 15,000 धावांच्या जवळ आला आहे. कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 260 एकदिवसीय सामन्यांत 12,311 धावा केल्या आहेत. 15,000 धावांपासून तो फक्त 2689 धावाच दूर आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंझत असलेल्या कोहलीला हा विक्रम हा टप्पा ओलांडण्यास आणखी काही काळ लागू शकेल. Sachin Tendulkar
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cricbuzz.com/profiles/25/sachin-tendulkar
हे पण वाचा :
UPI ट्रान्सझॅक्शन मध्ये झाली वाढ, त्याद्वारे पैसे कसे पाठवायचे ते पहा
GST कौन्सिलच्या बैठकीत Cryptocurrency बाबत काय निर्णय झाला ??? जाणून घ्या
Investment : मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Credit Card चे लिमिट वाढवण्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या
Income Tax Return भरण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत??? समजून घ्या