हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १४ नोव्हेंबर २०१३ ही तारीख आणि तो क्षण आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे. ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणतो त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याच दिवशी क्रिकेटला पाणावलेल्या डोळ्यांनी अलविदा म्हटलं होत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा खेळाडू म्हणून सचिनने शेवटचा सामना खेळला होता. आता त्याच मैदानावर सचिन पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार झाला आहे. ते ही आपल्या जुना जोडीदार वीरेंद्र सेहवाग सोबत. वानखडेच्या मैदानावर आजपासून, ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज’ मुंबईत सुरू होत आहे. ज्यामध्ये भारताचा ‘इंडियन लीजेंड्स’ संघ वेस्ट इंडिजच्या ‘वेस्ट इंडिज लीजेंड्स’ संघासोबत भिडणार आहे. इंडियन लीजेंड्सचे नैतृत्व कर्णधार म्हणून सचिन तेंडुलकर करत आहे तर वेस्ट इंडिज लीजेंड्सचा कर्णधार ब्रायन लारा असणार आहे.
‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’
जगभरातील लोकांना रस्ता सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्यासाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आयोजन करण्यात आलं आहे. भारतात दर ४ मिनिटाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. या क्रिकेट सीरिजमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज व्यतिरिक्त श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा संघ देखील भाग घेत आहेत. या सर्व संघात माजी दिग्गज खेळाडू भाग घेत आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये अंतिम सामन्यासह एकूण ११ सामने होणार आहेत. पहिला सामना ७ मार्च रोजी होईल, तर अंतिम सामना २२ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. मालिकेचे सर्व सामने मुंबई व पुणे येथे खेळल्या जातील आणि प्रत्येक संघ 4 लीग सामने खेळेल.
इंडियन लीजेंड्सचा संघ – अजित आगरकर, साईराज बहुउटुले, संजय बांगर, समीर दिघे, मनप्रीत गोनी, मोहम्मद कैफ, झहीर खान, अभय कुरुविला, प्रज्ञान ओझा, मुनाफ पटेल, इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग.
वेस्ट इंडीज लीजेंड्सचा संघ – सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, टिनो बेस्ट, शिवनारायण चंद्रपॉल, पड्रो कोलिन्स, डॅरेन गंगा, कार्ल हूपर, डेन्जा हयात, रिडली जेकब्स, ब्रायन लारा, रिकार्डो पॉवेल, दीनानाथ रामनारायण, अॅडम सॅनफोर्ड. ली, ब्रेट हॉज, जॉन्टी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान आणि अजंता मेंडिस हे दिग्गज क्रिकेटपटूही यात सहभागी होणार आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.