हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) वेगवान तपासामुळे गेल्या काही तासांत अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. याप्रकरणातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांनीच ही माहिती ‘एनआयए’ला दिल्याचे समजते.
एका मराठी वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानूसार, NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे आता NIA या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी काही कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्याची गरज असल्याचे या अधिकाऱ्याच्या चौकशीला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. परंतु, NIA लवकरच दोन्ही वाहनचालक आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याला अटक करेल, असे समजते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group