हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ही पोलीस अधिकारी सचिन वाझेंनीच (Sachin Vaze) ठेवल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सचिन वाझेंनी अंबानींच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जाते आहे. त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडाली आहे.
वाझेंवर फसवणूक, विस्फोटकांशी निष्काळजीपणा बाळगणे, बनावट मोहर बनविणे आणि धमकी देण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. स्कॉर्पिओ कारचे मालक मनसूख हिरेन हत्या प्रकरणातही वाझेंचे नाव येत आहे. वाझे यांचा अंबानी यांच्या निवासस्थानाशेजारी जिलेटीनने भरलेली कार पार्क करण्याच्या कटात थेट सहभाग होता, असा आरोप एनआयएने लावला आहे. यामुळे मनसूख हिरेन मृत्यू आणि स्फोटकांच्या कारचा थेट संबंध वाझेंशी जोडला जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group