हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर भाजपकडून सरकार वर ताशेरे ओढले जात आहेत. याच मुद्द्यांवरून भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. वाईन म्हणजे पाणी असेल तर शासकीय दवाखान्यात रुग्णांसाठी खाद्याबरोबर वाईन द्या आणि मंत्रालयात पाणी म्हणून वाईन ठेवा अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी आहे. शेतकऱ्यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईनचा निर्णय घेतला गेला, गावातल्या डेअरी बंद करा आणि वायनरी काढा असा टोसा सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. तसेच वाईन उद्योगात सगळ्या नेत्यांचे पैसे गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, वाईन हे जर पाणी असे वाटत असेल तर, मद अंगणवाडीच वाईन द्या, शासकीय दवाखान्यात रुग्णांसाठी खाद्याबरोबर वाईन द्या, देवासमोर तिर्थ म्हणून वाईन ठेवा, मंत्रालयात पाणी म्हणून वाईन ठेवा अशी टीका खोत यांनी राज्य सरकारवर केली