सांगली | शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्या लोकांना आमची मदत कमीच वाटणार, असं म्हणून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज ठाकरे आणि जयंत पाटील यांना टोला लगावला. कांद्याच्या दरावरुन ठाकरे आणि पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
‘आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल याकडे गांभीर्याने लक्ष देतो’ असं म्हणून त्यांनी आज राज आणि जयंत पाटील यांच्यावर तोंडसूख घेतले. ‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय केले पाहिजे एवढे समजण्याएवढे सरकार हुशार आहे. शेतात काम करून आलेली आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केलेली आमच्यासारखी माणसे या सरकारमध्ये काम करत आहेत.’ त्यामुळे याबाबत दुसऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आम्हाला शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाची काळजी आहे’ असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी मंत्र्यांना कांदे फेकून मारा या राज ठाकरेच्या टीकेला उत्तर दिलं.
“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांना ५० पैशांपासून एक रुपयापर्यंत मदत देण्यात आली होती. आमच्या सरकारने किलोला दोन रुपये मदत दिली आहे. म्हणजे आघाडी सरकारपेक्षा आम्ही दुप्पट मदत केली आहे, तसेच गरज भासली तर आणखी मदत देण्याची तयारी राज्य सरकारची आहे. ज्यांनी शेतकऱ्यांना मदतच दिली नव्हती त्यांना आमच्या सरकारने दिलेली मदत कमीच वाटणार,” असा टोला सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांना लगावला.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…
जनतेचा नरेंन्द्र मोदींवरचा विश्वास उडाला आहे – राज ठाकरे
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
बच्चू कडू लढणार जालण्यातून लोकसभा, रावसाहेब दाणवेंना देणार टक्कर