मुख्यमंत्री फडणवीसजी बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत- सदाभाऊ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली मात्र तिथे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र भाषणाची संधीच न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. याचवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

अमोलजी, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला प्रोटोकॉल समजला का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत.तो आठवावा शपथविधी….! ???? अस ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवुन घेणार नाही अस अमोल मिटकरी यांनी म्हंटल.

तुकोबारायांचा “भले तरी देऊ कासेची लंगोटी l नाठाळाचे काठी हाणु माथा ll “हा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये याची काळजी श्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धर्मीक द्वेष पसरवणाऱ्या आध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्यांनी घ्यावी असा टोला त्यांनी लगावला.

कार्यक्रमात नेमकं काय घडलं-

देहू येथील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर अजित पवार भाषण करतील अस वाटलं होतं मात्र सुत्रसंचालकांनी थेट पंतप्रधान मोदी यांना भाषणासाठी आमंत्रित केले. आणि अजित पवारांना भाषणाची संधीच मिळाली नाही. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले.

Leave a Comment