सदाभाऊ खोत इस्लामपूर मधून ‘कमळ’ चिन्हावर लढणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

भाजपने आगामी विधानसभा लढण्याची जोरदार तयारी केली असून भाजप व शिवसेना प्रत्येकी १३५ व मित्र पक्षांना १८ जागा असा फॉर्म्युला तयार केला आहे. मात्र मित्रपक्षांमधील अनेक जागा या कमळ चिन्हावर लढविल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना सहा जागा मागत असली तरी किमान तीन जागा तरी त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.

यामध्ये इस्लामपूरच्या जागेवर खुद्द सदाभाऊ खोत यांना आ.जयंत पाटील यांच्या विरोधात उतरविण्याची भाजपची रणनिती असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची याबाबत अनौपचारिक बैठक झाली असून बारामतीप्रमाणे इस्लामपुरात जयंतरावांना टक्कर देण्यासाठी भाजप सर्व आयुधे वापरणार आहे. खोत यांनी मतदार संघात केलेली विकासकामे व चळवळीच्या माध्यमातून बांधलेली मोट विधानसभेत उपयोगी पडू शकते.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे बैठक झाली. यामध्ये आगामी विधानसभा एकत्रित लढण्यावर बैठक झाली. घटक पक्षांना अठरा जागा देण्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेलाही जागा मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर रयत क्रांतीने विधानसभेसाठी मशागत करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp  ग्रुपची लिंक – https://bit.ly/2WAGC24

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

इतर महत्वाच्या बातम्या –

राष्ट्रवादीचा हा नेता आगामी विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत!

वसंतदादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये पायघड्या घालून स्वागत करु, चंद्रकांत पाटीलांची विशाल पाटलांना खूली आॅफर

अमरावती : बच्चू कडू देणार शिवसेनेला पाठिंबा ?

राजू शेट्टी हे अलीबाबा चाळीस चोरांच्या टोळीचे भागीदार : सदाभाऊ खोत

Leave a Comment