वसंतदादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये पायघड्या घालून स्वागत करु, चंद्रकांत पाटीलांची विशाल पाटलांना खूली आॅफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस मधील वाद चव्हाट्यावर आलेला असताना ‘वसंतदादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये आम्ही पायघड्या घालून स्वागत करु’ अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशाल पाटील यांना खूली आॅफर दिली आहे. वसंतदादा पाटील यांचे वारसदार विशाल पाटील हे सांगली लोकसभेकरता काँग्रेस कडून इच्छुक आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने ही जागा स्वाभिमानीला देण्याचे निश्चित केल्याने पाटील यांच्यासमोर तिढा निर्माण झाला आहे.

वसंतदादा घराण्याचे महाराष्ट्रावर मोठे उपकार आहेत. मात्र वसंतदादा घराण्याची वाट लावण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने चालवलेले आहे. दादा घराण्याचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. दादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये आम्ही पायघड्या घालून स्वागत करु व त्यांचा सन्मान करु, अशी स्पष्ट ऑफर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार शुभारंभात बोलताना दिली.

संजयकाका पाटील यांना विक्रमी मताधिक्यांनी निवडून देण्याचा निर्धार यावेळी सर्वच वक्त्यांनी केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. तत्पुर्वी सर्व मान्यवरांनी दत्त मंदिरात जाऊन प्रचार शुभारंभाचा नारळ फोडला. या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तासगाव तालुक्यातील अंजनी येथील काही कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा प्रचार शुभारंभ आज औदुंबर येथील श्री दत्त मंदिराच्या आवारात झाला. त्याप्रसंगी महसूलमंत्री पाटील बोलत होते. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ.शिवाजीराव नाईक, आ.सुधीर गाडगीळ, आ.सुरेश खाडे, आ.विलासराव जगताप, शिवसेनेचे आ.अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आ.अजितराव घोरपडे, यांच्यासह भाजप-शिवसेना, आरपीआय, रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..

अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर

नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट

मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर

Leave a Comment