परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिर्डीकरांसोबत झालेल्या बैठकीनंतर साई जन्मभूमीचा वाद संपला असे वाटत असताना, सर्वपक्षीय पदाधिकारी व साईभक्तांनी मोठ्या संख्येने पाथरीत एकत्र येत मंगळवारी मंदिरामध्ये महाआरतीच आयोजन केलं होतं. यानंतर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असल्याचा एक मुखाने ठराव घेण्यात आला. शिर्डीकर यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आता आमची बाजू ऐकून घ्या म्हणत, पुढील दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व साईभक्तांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला जाणार असल्याचे यावेळी ठरलं.
साईबाबांच्या जन्मस्थानावरून उठलेल्या वादामध्ये रविवारी शिर्डीकर यांनी बंद ठेवल्यावर पाथरीकरांनी मंगळवारी महाआरतीचे आयोजन करणार असे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे आज मंगळवार दि. २१ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार व साईभक्तांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये महाआरती घेण्यात आली. यानंतर ग्रामसभेचे सर आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये पाथरी येथील श्रीसाईबाबा स्मारक समितीचे विश्वस्त व कृती समितीचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्रानी, आ. सुरेश वरपुडकर, आ. राहुल पाटील व खासदार संजय जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना आमदार बाबाजानी दुर्रानी म्हणाले की, साईजन्मस्थान वादावरून एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ! छत्रपती शिवरायांच्या जन्मतारखेचा वाद सोळाव्या शतकातील असूनही शासनाने गठीत केलेल्या समितीने सोडवला असेल तर अठराव्या शतकातील साईबाबा जन्मस्थानाचा वाद ही शासनाने समिती गठीत करून सोडवावा. समितीचा जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल तोपर्यंत पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान आहे यावर आम्ही ठाम असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्याचे खासदार संजय जाधव म्हणाले की, आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत त्यांना आमच्याकडून पुरावे देणार असून त्यानंतर परभणी मध्ये साईभक्तांचे उपस्थिती मध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान आजच्या ग्रामसभेनंतर पाथरीकरांची पाथरी जन्मस्थान, धुपखेडा प्रकटस्थान तर शिर्डी कर्मभूमी अशी स्पष्ठ भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी जन्मभूमी शब्द मागे घेतल्याने वाद संपला असे शिर्डीकर सांगत असले तरी समिती गठित करुन निर्णय येईपर्यंत पाथरी हेच साईजन्मस्थान असल्याबद्दल वाद सुरूच राहणार आहे असं दिसत आहे .
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
साई जन्मस्थानाचा राजपत्रांमध्ये उल्लेख ; वयोवृद्ध अभ्यासकाकडे साईस्थानाचा शासकिय पुरावा
अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन
‘तो’ वादग्रस्त व्हिडीओ युट्युबवरून हटवा; गृहमंत्री अनिल देशमुखांचे निर्देश
पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींची शिवरायांशी तुलना असह्य; संभाजीराजे भाजपवर संतापले