‘दबंग गर्ल’ सई मांजरेकर दिसली मराठमोळ्या अंदाजात; सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने सलमान खानच्या ‘दबंग ३’ या ऍक्शन पॅक सिनेमातून बॉलीवूडमध्ये नुकतंच पदार्पण केलं आहे. सिनेमातील सईच्या सुंदर सोज्वळ लुक्समुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सई सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. सईने नुकताच आपला नऊवारी साडीतला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमधील सईचा अस्सल मराठमोळा लूक पाहून नेटकऱ्यांसह सेलिब्रिटीसुद्धा घायाळ झाले आहेत.


View this post on Instagram

Navrai Majhi Laada Chi ????‍♀️

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on Jan 18, 2020 at 12:54am PST

हा फोटो पाहाता एका लग्नात जाण्यासाठी सईने ही सर्व तयारी केली आहे असं दिसत आहे. नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर टिकली, झुमके असा पारंपरिक वेश तिने केला आहे.सईने आईसोबतचाही एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मेधा मांजरेकरसुद्धा मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. या फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकर, क्रांती रेडकर यांनीसुद्धा कमेंट केल्या आहेत.

Untitled design (22)

सईने पहिल्याच चित्रपटातून तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. ‘दबंग ३’मध्ये तिने सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला पण सईच्या अभिनय कौशल्याची चर्चा सर्वत्र झाली.


View this post on Instagram

 

Awara.. dil mera ????

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on Dec 21, 2019 at 4:00am PST