साजूरला बिबट्याचा मृत्यू; लोकांच्यात घबराटीचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील साजुर येथील एका रानात बिबट्याचा मृत्यू झाला आहे. अनिल चव्हाण यांच्या बाराबहिदरा या रानात बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. बिबट्याच्या वावराने घबराटीचे वातावरण आहे.

तांबवे भागातील साजूर, गमेवाडी, डेळेवाडी या डोंगर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 2 ते 3 बिबट्याचा मृत्यू झाला आहे. तर बिबट्याने पाळिव प्राण्यावर हल्ला करून ठार केले आहे. त्याचबरोबर लोकांच्यावर प्राणघातक हल्ले केले आहेत.

साजूर येथे घटनास्थळी मृत बिबट्या पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. साजूर मध्ये नर बिबट्या बारा भाई दरा या ठिकाणी बेशुद्ध होता 8.40 ला मृता अवस्थेत आढळला. शेतकरी अनिल शंकर चव्हाण, दत्ताञय उथळे हे शेतात वैरण काढायला गेले असता त्यांना हा बिबट्या मृतावस्थेत आढळला. घटनास्थली वन आधिकारी मयुर जाधव हे उपस्थित आहेत तसेच प्राणी मिञ रोहीत कुलकर्णी , संरपच संदीप पाटील पोलीस पाटील मुळगांवकर वा सागर चव्हाण उपस्थित आहेत.