साक्रीत युवा सेनेतर्फे वृक्षारोपण करून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात युवा सेनेतर्फे साक्री पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करून युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या पर्यावरण हित साधणाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.धुळे जिल्हा युवा सेना प्रमुख ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या मार्गदर्शनाने आणि साक्री तालुका युवा सेना प्रमुख चेतन देवरे यांच्या संकल्पनेने या अनोख्या प्रकारच्या शुभेच्छा आदित्य ठाकरे यांना देण्यात आल्या आहेत.

या प्रसंगी साक्री तालुका युवा सेना प्रमुख चेतन उर्फ बाळासाहेब देवरे यांनी सांगितले की “आदित्य ठाकरे साहेबांचे पर्यावरण विषयक प्रेम अख्या राज्याला माहिती आहे.पर्यावरण विषयक अनास्थेमुळे आजवर पर्यावरणाची खूप मोठी हानी झाली आहे.त्यात भरीव काम करून पर्यावरणाचं आणि पर्यायाने अखिल जीवसृष्टीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदित्य साहेबांना काम करायचं आहे.इतर मंत्रालयं मिळतं असताना देखील त्यांनी पर्यावरण मंत्रालय मागून स्वतःकडे घेतलय अशा आमच्या पर्यावरण प्रेमी नेत्याला इतर प्रकारे शुभेच्छा देण्यापेक्षा वृक्षारोपण करून शुभेच्छा द्याव्या ही यामागची आमची भावना आहे.

तसेच यावेळी साक्री पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार,एएसआय साळुंखे नाना,चेतन गोसावी यांनी कोविड काळात भरीव कामगिरी केली म्हणून त्यांचा “कोविड योद्धा” असा सत्कार देखील करण्यात आला.

दरम्यान,या वृक्षारोपणाचा कार्यक्रमाला युवासेना तालुका प्रमुख-चेतन (बाळा)देवरे,
तालुका समन्वयक-केशव शिंदे,उपतालुका प्रमुख-हिंमत सोनवणे,पंकज मारणार
तालुका सोशल मीडिया प्रमुख -जिवा पाटील,साक्री शहर प्रमुख-पंकज गवळी,उपशहर प्रमुख-वैभव भिंगार,उपशहर प्रमुख-अजय जाधव, शाखा प्रमुख-पंकज गिरी, उपशाखा प्रमुख-पप्पू राठोड,प्रशांत राठोड, विशाल भोसले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment