कोरोना काळात 28 घरफोड्या करणारे ‘साला-मेहूणे’ पोलिसांच्या ताब्यात

0
37
chori
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – भर कोरोना काळात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल 28 घरे फोडणाऱ्या साला- मेहुण्याच्या जोडीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने काल पकडले. या चोरट्यांकडून सोन्या-चांदीचे दागिने, 14 हजार रुपये आणि मोबाईल कट्टर असा सुमारे 3 लाख 63 हजार 43 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक निमित्त गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. संजय शिंदे (29) आणि रामाअण्णा पवार (26) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले की जानेवारीपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणची बंद करे फोडून किमती ऐवज चोरीला जाण्याच्या घटना सतत घडत होत्या. प्रत्येक ठिकाणी चोरट्यांनी कुलूप कटरने तोडून चोरी केल्याचे दिसत होते. यावरून या घरफोड्या करणारी एखादी मोठी गॅंग असावी असा संशय पोलिसांना होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमळस, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप दुबे, हवालदार नामदेव शिरसाट, संजय देवरे, विठ्ठल राख, बाळू पाथ्रीकर, श्रीमंत भालेराव, किरण गोरे, वाल्मीक निकम, राहुल पगारे, शेख नदीम, शेख अख्तर, बाळासाहेब नवले, ज्ञानेश्वर मिठे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांच्या पथकाने या सर्व घरफोड्यांच्या तपास सुरू केला होता. किनगाव येथील काकासाहेब चव्हाण यांचे 10 ऑक्टोबर रोजी रात्री घर फोडून चोरट्यांनी 99 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. यासंबंधी त्यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती.

तत्पूर्वी वडोद बाजार ठाण्याच्या हद्दीतील सात ते आठ घरे फोडली होती. तेथील एका सीसीटीव्ही कॅमेरात एक चोरटा कैद झाला होता. त्याचे वर्णन आणि खबर्‍याने दिलेल्या माहितीच्या आधारे या सर्व घरफोड्या भोकरदन तालुक्यातील शिंदे यांच्या टोळीने केल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन्ही आरोपी रामा पवार व संजय शिंदे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला ते मी नव्हेच असे सांगत होते. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी साथीदारांसोबत 45 घरी फोडल्याची कबुली दिली यात औरंगाबाद जिल्ह्यातील 28 चोर यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here