हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी बिग बॉस 18 नुकताच सुरू झाला असून, हा शो पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहेत. लोकांचा या शोला खूप प्रतिसाद मिळत असून, शोचे होस्ट सलमान खान असल्यामुळे चाहतावर्ग याकडे आकर्षित होत आहे. पण सलमान खान यांनी पहिल्याच आठवड्यात शुटींग रद्द केल्याची बातमी समोर येत आहे. सलमान खान शोचे होस्ट नसणार आहेत, त्यामुळे चाहत्यांच्या मनात नाराजी पसरली आहे. माजी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानने बिग बॉस 18 चे शुटींग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे .
सलमान खान आणि बाबा सिद्दीकी अनेक वर्षांपासून मित्र
12 ऑक्टोबरच्या रात्री बांद्रा येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली . सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचे खूपच जवळचे संबंध होते. हे दोघे अनेक वर्षांपासून मित्र होते. सिद्दीकी हे नेहमी त्यांच्या इफ्तार पार्टीला सलमान खानला आमंत्रण द्यायचे आणि सलमान खान न चुकता त्या पार्टीला हजेरी लावत होते. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील वाद मिटवण्यातही बाबा सिद्दीकी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
चाहते सलमानच्या निर्णयामुळे झाले निराश
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय आहे. या प्रकरणामुळे सलमान खानच्या सुरक्षेचा मुद्दाही गंभीर बनला आहे, कारण पूर्वीही बिश्नोई गँगने सलमान खानवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सलमान खानला मुंबई पोलिसांनी सिद्दीकी कुटुंबीयांना भेटण्यास नकार दिला आहे. तसेच त्याला कोणतेही शुट न करता घरीच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सलमान खान आता शोचे शूट करू शकणार नाही. त्यामुळे बिग बॉस 18 चे चाहते सलमानच्या या निर्णयामुळे निराश झाले आहेत. पण सलमान खान सुरक्षित राहण्याचा मुद्दाही महत्वाचा आहे.