Tuesday, January 7, 2025

कोरोना संकटात भाईजान सलमानने दिली ५ हजार कुटुंबांना ईदी

मुंबई । बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान कोरोना व्हायरसच्या संकटात गरजुंच्या मदतीला सतत धावून जाताना दिसत आहे. दरम्यान, या संकट काळात संपूर्ण देशात पवित्र रमजान ईद साजरी करण्यात आली. नेहमी पेक्षा यंदाच्या वर्षाची ईद वेगळी असली तरी सलमानने अनोख्या अंदाजात ईद साजरी केली. ईद या सणाचे औचित्य साधत सलमानने ५ हजार कुटुबांना ईद किटचं वाटप केलं आहे. अशा प्रकारे सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी यंदाची ईद देखील खास केली.

या संदर्भातील माहिती युवासेनेचे सदस्य राहुल एन कानल यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली. त्यांनी आपल्या ट्विटद्वारे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये लोक फूड किट तयार करताना दिसत आहेत. ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

फोटो पोस्ट करत राहुल एन कानल यांनी कॅप्शनमध्ये ‘सलमान तुझे आभार.. ईदच्या मुहूर्तावर तू तब्बल ५ हजार कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. केवळ आपल्यासारखे लोक समाजात संतुलन राखून ठेवतात.’ लिहिलं आहे. दरम्यान, देशभरात कोरोनामुळं उदभवलेल्या या परिस्थितीमुळं बॉलिवूड सुद्धा ठप्प पडलं आहे. शिवाय सलमानचा आगामी चित्रपट ‘राधे’ला देखील लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”