भाईजान सलमान च्या ‘राधे…’ ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळतो आहे. याचा फटका बॉलीवूड इंडस्ट्रीला ही बसतो आहे. आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचा बहुचर्चित ‘राधे:युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असे दिसते आहे. राधे हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे या सिनेमाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलमानचा राधे…पाहण्यासाठी प्रेक्षकांना देखील आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल असे दिसते आहे. हा चित्रपट मागच्या वर्षी 2020 ला प्रदर्शित होणार होता मात्र कोरोना मुळे त्याचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं.

सलमान खान ने कबीर बेदी सोबत केलेल्या एका फेसबुक लाइव्ह मध्ये या सिनेमाबाबत काही माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की, ‘आम्ही राधे… सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत परंतु सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन नंतरही सुरूच राहिलं तर कदाचित हा सिनेमा पुढच्या ईदला प्रदर्शित होईल’.

यावेळी माहिती देताना सलमान ने सांगितले की कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. लोकांनी काळजीपूर्वक व्यवहार सुरू केले, मास्क लावत सोशल डिस्टंसिंग च्या सगळ्या नियमांचं पालन केले तर करोनाचे लवकरच उच्चाटन होईल. जर असे झाले तर या ईद लाच राधे सिनेमा प्रदर्शित करू’.

इतके सांगूनही लोक ऐकत नसतील आणि त्यामुळे कोरोना च्या केसेस वाढल्या तरी त्यामुळे अनेकांचे नुकसान होणार आहे यामध्ये केवळ सिनेमागृहचेच नुकसान नाही तर अनेक मजुरांचे नुकसान होईल हे खूपच वाईट असेल. जी परिस्थिती गेल्या वर्षी होती तशीच होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यायला हवी असं सलमान खानने म्हटलं आहे.

‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवाने केले आहे तर या सिनेमात सलमान शिवाय दिशा पटानी, रणदीप हुडा आणि जॉकी श्रॉफ हे कलाकार आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group