हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर सलमानच्या अनेक चाहत्यांनी याबाबत रिव्ह्यू दिले आहेत. तर ज्यांनी अजून चित्रपट पहिला नाही त्याना या चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता आहे. चित्रपट काय आहे? कसा आहे? आणि पैसा वसूल आहे कि वाया हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
https://www.instagram.com/p/COzS9Kuj_jl/?utm_source=ig_web_copy_link
तर भाईजानच्या या सिनेमाची स्टोरी रंगते ती मुंबईत. स्वप्नांची नगरी म्हणवणा-या मुंबईत ड्रग्ज माफियांचे राज्य आहे आणि यांचा सफाया करणे गरजेचे आहे. याकरिता राधे या पोलिस अधिका-यावर ही जबाबदारी सोपवली जाते. १० वर्षांच्या सेवेत ९७ एन्काऊंटर करणारा राधे मुंबईत येतो आणि इथूनच खरा सिनेमा सुरु होतो.
https://www.instagram.com/p/COzA2xkhJya/?utm_source=ig_web_copy_link
सलमानचा सिनेमा म्हटल्यानंतर तो एक टिपिकल बॉलिवूड सिनेमा असणार, हे काही तिखट मसाला लावून सांगायची गरज नाही. सलमानच्या या सिनेमातही अॅक्शन आहे, ड्रामा आहे, कॉमेडी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तो स्वतः आहे. या सिनेमातील सलमान व रणदीप यांच्यातील टक्कर पाहताना मजा येते. सिनेमातील अॅक्शन पाहतांना थोडे चांगले वाटते.
https://www.instagram.com/p/COzRfJ3h18H/?utm_source=ig_web_copy_link
पण जसाजसा सिनेमा पुढे जातो, तसा अनेकठिकाणी भरकटतो. दिशा पटनी सिनेमात ग्लॅमरचा तडका लावताना दिसते. पण तिची एन्ट्री मूळ कथेला भलत्याच दिशेला घेऊन जाते. मध्येच येणारी गाणी कथेत ‘अनफिट’, नॉट सुटेबल वाटतात. सलमानसोबतची तिची केमिस्ट्रीही अनेकठिकाणी… नाही नाही जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी खटकते.
https://www.instagram.com/p/COju9PDjWoA/?utm_source=ig_web_copy_link
मुख्य म्हणजे नाराजीची बाब हि कि हा सिनेमा काही अनोखा, आगळा वेगळा नाहीये. पुन्हा एक रिमेक पाहिल्याचे तुम्हाला जाणवेल. यातील गाण्यांमध्ये पण कमालीचे वेगळेपण ठेवले आहे. म्युझिक पासून ते डान्सिंग स्टेप्स पर्यंत सगळंच कस सेम टू सेम आणि अतिशय फ्लॉप. कारण मूळ गाण्यातील डाँसिन्ग स्टाईल आणि हिरो यांच्यासमोर बऱ्यापैकी भाईने कितीपण जान ओतली तरी फायदा?? शून्य
https://www.instagram.com/tv/COezW20lyiP/?utm_source=ig_web_copy_link
सलमान बद्दल बोलायचे झालेच, तर तो आपल्या चाहत्यांना निराश करूच शकत नाही, असा एक समज आहे. त्याची स्टाईल, स्वॅग, डायलॉगबाजी, अॅक्शन, कॉमेडी टायमिंगसाठी त्याचे चाहते वेडे आहेत, पण हा सिनेमा पाहिल्यावर थोडी नाराजी वाटूच शकते. कारण चित्रपटात काही ठिकाणी त्याचे डायलॉग जरा जास्तच फिल्मी वाटतात. हा तशी हि एक फिल्म आहे म्हणून एवढं फिल्मी??? या सिनेमात अनेक विलन आहेत. पण रणदीप सर्वांवर भारी पडतो. सिनेमात हार्ड-कोर अॅक्शन आहे आणि सोबत नको तिथे कॉमेडी पंच आहेत. अर्थात प्रत्येकवेळी कॉमेडी जमेलच असे गृहीत धरू शकत नाही.
https://www.instagram.com/tv/CODOCvkBWiC/?utm_source=ig_web_copy_link
एकंदर काय तर सलमानचे फॅन असाल आणि त्याच्या अॅक्शन सिनेमाचे दिवाने असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. पण यापैकी तुम्ही नसाल तर तुमचे पैसे गंगेत गेले म्हणायला हरकत नाही. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणे खरतर सलमानच्या चाहत्यांसाठी रोमांचक अनुभव ठरला असता. पण कोरोना महामारीमुळे त्यांना ओटीटीवरच या सिनेमाची मजा घ्यावी लागणार आहे. तसे पाहता हा चित्रपट पाहायचा का नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. पण एकंदर हे रिव्ह्यूज तुम्हाला मदत करतील अशी आशा आहे.