महाराष्ट्रात वाढणार रोजगाराची संधी; छत्रपती संभाजीनगरमध्ये वसणार औद्योगिक शहर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये गेले काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विकास घडलेला दिसत आहे. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी देखील नवनवीन प्रकल्प राबवले जातात. यासाठी आता बारा ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्याचे काम देखील घेण्यात येणार आहे. यासाठी सरकारने एक मोठी योजना घेतलेली आहे. 2024 मध्ये आर्थिक अर्थसंकल्प सादर झाला यावेळी निर्मला सीतारामन यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे अनेक नवीन महामार्ग एक्सप्रेस तयार करण्यावर जास्त भर दिला जाणार आहे. त्यामुळे आपल्या राज्याचा संपूर्ण चेहरा बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने आता 12 नवीन शहरांना औद्योगिक हब करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश आहे.

आपले देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील 12 नवीन औद्योगिक शहरे स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातील आंध्र प्रदेशमध्ये दोन आणि बिहारमध्ये एक आहे. या औद्योगिक शहरांमुळे आता राज्यात रोजगाराची संधी देखील निर्माण होणार आहे. अनेकांना काम देखील मिळणार आहे.

2023 – 24 चा अर्थसंकल्पात उत्पादन वाढवण्यासाठी आणि राज्य तसेच खाजगी क्षेत्राच्या भागीदारीत 100 शहरात प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. याबद्दलची माहिती राजेश कुमार सिंग यांनी दिलेली आहे. या आधीच आठ शहरांमध्ये औद्योगिकीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे. या चार शहरांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आंध्र प्रदेशमध्ये सुरुवात देखील झालेली आहे. आणि उद्योगासाठी आता जागा वाटपाचे काम देखील सुरू झालेले आहे. त्यामुळे या शहरांमध्ये जळणवळण सुविधा पाणी वीज आणि इतर पायाभूत सुविधा देखील लवकरात लवकर होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात 8 शहरांचा समावेश

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुरुवातीला आठ औद्योगिक शहरात पायाभूत सुविधा विकसित केलेले आहे. बजेटमध्ये यावर्षी 12 नवीन शहरांचा समावेश देखील केलेला आहे. परंतु येथे काही दिवसातच या शहरांची संख्या 20 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या देशात रोजगार निर्मिती होणार आहे. आणि इतर राज्य स्थलांतरित होणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील कमी होणार आहे.