छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संभाजीराजे संतप्त; मोदींकडे केली ही मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात आणि किल्ले पण जिंकलेले आहेत. आणि त्यातील सगळे बऱ्यापैकी सगळे किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहे. हा इतिहास आज आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळतो हे आज आपलं भाग्यच आहे. शिवाजी महाराजांचे अनेक जलकिल्ले देखील आहेत. त्यातीलच एक किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला. काही दिवसापूर्वी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळा कोसळला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे राजकोट किल्ल्यावर नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन देखील करण्यात आले होते. परंतु हा पुतळा अचानक कोसळला. परंतु एवढा मोठा पुतळा अचानक कसा कोसळला? याचे कारण अजूनही समोर आलेले आहे नाही. या घटनेमुळे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती हे नाराज झालेले आहेत. आणि त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे.

नौदल दिनाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथे छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले होते. परंतु हा पुतळा अचानक कोसळल्याने आता शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आलेले होते. या घटनेवरून संभाजी राजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारण्याची देखील मागणी केली आहे. तसेच आता निवडणुका असल्यामुळे कामात कोणत्याही प्रकारची गडबड करू नका. असे देखील त्यांनी उद्देशून म्हटलेले आहे.

संभाजी राजे छत्रपती यांनी एक्सवर माहिती देणारी एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहे की, “पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाईगडबडीत उभारलेला पुतळा आज कोसळलेला आहे. मुळातच आकारहीन आणि शिल्प शास्त्रास अनुसरून नसलेला आणि घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. परंतु आपले महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अगदी वर्षभरातच कोसळते. ही खूप दुर्दैवी घटना आहे. या परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यावर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार? आता त्या ठिकाणी पुन्हा महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या परत काही गडबड करू नका. उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.”

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम देण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आलेला होता. 4 डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु पुतळा उभारलेला एक वर्ष देखील झालेले नाही. परंतु हा पुतळा कोसळला असल्याने छत्रपती संभाजी राजे छत्रपती यांचा संताप झालेला आहे.