औरंगाबाद | आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज अस्वस्थ आहे.समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी मी राज्यात फिरत आहे.माझा दौरा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही. असे स्पष्ट करीत उद्या शरद पवार यांची मुंबईत भेट घेऊन शुक्रवारी माझी भूमिका स्पष्ट करेल. असे छत्रपती संभाजी राजे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
छत्रपती संभाजी राजे हे औरंगाबाद दौऱ्यावर होते.आज त्यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकर परिषदेत मराठा अरक्षणा बाबत पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी बोलताना सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही,सरकार ऐकत नसेल तर आंदोलन ठीक आहे.मात्र हा सगळा विषय सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे सरकारने काय देता येईल ते द्यावे आंदोलन करून सध्यातरी मार्ग निघणार नाही असे म्हणाले.पुढे बोलताना समजला राजकीय रंग देऊ नका,राज्य कर्त्यांनी आता भूमिका मांडण्याची गरज आहे.सगळ्या नेत्यांनी राजकारण सोडून समाजासाठी काय करता येईल या कडे लक्ष द्यावे.
राजीनामा बाबत बोलताना कुणी राजीनामे द्यावे हे मी सांगू शकत नाही मात्र माझ्या राजींनाम्याने प्रश्न सुटत असेल तर मी राजीनामा दिलंय असे छत्रपती म्हणाले,तर सारथी विषयी बोलताना आरक्षणापेक्षा सारथी जास्त महत्वच आहे.मराठा समाजाला दिशा देण्यासाठी सारथी जिवंत राहण्याची गरज आहे. उद्या ते शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहे. तर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मुंबईत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत संभाजी राजे यांनी दिली.