हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे एकमेव सुवर्णपदक ठरलं. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकत देशाची मान अभिमानाने उंचावली. नीरजच्या या यशानंतर त्याचा महाराष्ट्रात सत्कार करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केलीय.
नीरज चोप्राच्या खेळीकडे संपूर्ण भारताच्या नजरा खिळवून राहिल्या होत्या आणि याचवेळी सुर्वण पदक मिळवत नीरजचे अवघ्या देशाचे स्वप्न साकार केले. या स्वप्नपूर्तीनंतर आता नीरज चोप्राचा त्याच्या घरी जाऊन सत्कार करणार आहोत, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. यासह नीरजला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण देणार आहोत. महाराष्ट्रात त्यांचा सत्कार केला जाईल, असेही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
नीरज चोप्रा हा मराठाच आहे, मी त्याच्या घरी मी गेलो आहे. आणि आता देखील तो जेव्हा भारतामध्ये परतेल तेव्हा मी मराठा समाजाकडून त्याचा सन्मान करण्यासाठी त्याच्या हरियानातील गावी जाणार आहे.’ असे त्यांनी सांगितले आहे.