Shambhala Resort : महाबळेश्वर येथील आलिशान रिसॉर्टवर महसूल विभागाची कारवाई; हॉटेल सील (Video)

Shambhala Resort-2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचगणी (Mahabaleshwar News) |  सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी हि ठिकाणे थंड हवेची ठिकाणी म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत. देश विदेशातून शेकडो पर्यटक येथे भेट देत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पर्यटकांचा ओख जास्त असतो. आता रिसॉर्टवरील महसूल विभागाच्या कारवाईने महाबळेश्वर चर्चेत आले आहे. गुरुवारी महसूल विभागाने धड टाकून सांभाला रिसॉर्टवर कारवाई केली आहे. (Shambhala Resort)

अनधिकृत बांधकाम यावर जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांनी कारवाईचे आदेश दिले होते. यावरूनच महाबळेश्वर पाचगणी रोडवरील संभाला या धोकादायक रिसॉर्टवर महाबळेश्वर महसूल विभागाने कारवाई केली आहे. यावेळी हॉटेलला सील ठोकण्यात आले आहे. यामुळे आता इतर हॉटेल व्यवसायिकांनीही शासनाच्या कारवाईचा धसका घेतला असून येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामावर कारवाई होण्याची शक्यता आहे. Mahabaleshwar News

महाबळेश्वर पाचगणी विभागामध्ये ग्रामपंचायत, महसूल विभाग, नगरपालिका, पोलीस ठाणे, पंचायत समिती, वीज वितरण मंडळ यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयाने जिल्हाधिकारी यांचा आदेश अत्यंत गांभीर्याने घेतला असून महाबळेश्वर पाचगणी परिसरातील असणाऱ्या व तालुक्यात असणाऱ्या सर्वच अनाधिकृत बांधकामाला नोटीसा धाडले आहेत. यावरूनच आज पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील असणाऱ्या संभाला या रिसॉर्ट सील ठोकले आहे. Shambhala Resort