टिकटॉक स्टारर समीर गायकवाडच्या आत्महत्येने खळबळ ; राहत्या घरी घेतला गळफास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टिकटॉक स्टार अभिनेता समीर गायकवाड याने घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. इन्स्टाग्रामवर समीर हा एका नावाजलेला चेहरा म्हणून मागील महिन्याभरामध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

समीरचा भाऊ प्रफुल्लने या घटनेची माहिती लोणीकंदा पोलीस स्थानकामध्ये कळवली. समीरला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घरच्यांनी त्याला खाली उतरवरुन तातडीने लाईफ लाईन रुग्णालयामध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. समीरने आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. समीरच्या रुममध्ये किंवा खिशामध्ये कोणताही सुसाईड नोट मिळालेली नाही असं पोलिसांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितलं आहे. या प्रकरणामध्ये आता समीरच्या भावाची आणि जवळच्या नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच समीरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भातील काही माहिती समोर येऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही.म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’