Samruddhi Mahamarg : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग. हा प्रकल्प ९५ टक्के पूर्ण झाला आहे. लवकरच हा मार्ग प्रवाशांकरिता खुला होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्वाची बाब म्हणजे या महामार्गाचा विस्तार (Samruddhi Mahamarg) होणार असून राज्यातील आणखी २ महत्वाची शहरे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत. चला जाणून घेऊया या महामार्गाच्या विस्ताराबाबत
खरेतर या प्रकल्पातील तीन महामार्गांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या होत्या. या निवेदाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया, चंद्रपूरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर ते चंद्रपूर, नागपुर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली या तीन द्रुतगती महामार्गाचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 46 निविदा दाखल झाल्या आहेत. एमएसआरडीसीने या महामार्गासाठी तांत्रिक निविदा खुल्या केल्या आहेत. त्यानंतर आठवड्याभरातच आर्थिक निविदा खुल्या (Samruddhi Mahamarg) केल्या जाणार आहे. लवकरच या प्रकल्पासाठी कंत्राटदारांची नियुक्ती होणार आहे.
कसा असेल मार्ग ? (Samruddhi Mahamarg)
या विस्तारीकरणाचे उद्देश म्हणजे राज्याच्या सीमावर्ती भागांना मुंबईशी जोडणे हा आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबईपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. नागपूर ते चंद्रपूर असा 195 किमी लांबीचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. तर, नागपूर ते गोंदिया असा 162 किमी व भंडारा ते गडचिरोली असा 142 किमी लांबीचा महामार्ग (Samruddhi Mahamarg) उभारण्यात येणार आहे. हे तिन्ही महामार्ग खुले झाल्यानंतर विदर्भातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.