हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg Accident । मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. नागपूरच्या दिशेला जाणारी एर्टीगा कार दुभाजकावर आदळली. यात ३ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री ९ वाजता वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. जखमींना तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कसा झाला अपघात ? Samruddhi Mahamarg Accident
याबाबत अधिक माहिती अशी कि, पुण्यावरून जयस्वाल कुटुंब हे मारुती सुझुकी एर्टिगा कारने उमरेडकडे जात होतं. या दरम्यान, वनोजाजवळ पोहोचले असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार महामार्गावरील संरक्षक कठडे तोडून बाहेर गेली. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गाच्या बाजूला लावलेले लोखंडी ग्रील कारमध्ये घुसले. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कार इतक्या वेगाने पलटी झाली कि या अपघातात वैदेही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर चालक चेतन जयस्वाल, राधेश्याम जयस्वाल आणि संगीता जयस्वाल हे तिघे गंभीर जखमी झाले आहे.
सदर अपघाताची (Samruddhi Mahamarg Accident) माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उपस्थितीत असलेल्या लोकांनी जखमींना कारमधून बाहेर काढलं आणि वाशिमच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला होता, त्यानंतर आता आठ दिवसही उलटत नाहीत तोपर्यंत समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झालाय. . समृद्धी महामार्गांवरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य सरकारने अनेक उपाय योजना करुनही अपघात काय कमी होण्याचे नाव घेईनात, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.




