Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) दोन टप्प्यातील उदघाटन झाले असून आता तिसऱ्या टप्प्याचे उदघाटन दिनांक ४ मार्च रोजी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. भारवीर आणि इगतपुरी शहरादरम्यानचा समृद्धी महामार्गचा २५ किमीचा भागाचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.
एमएसआरडीसी कडून या रस्त्याचे .फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत उदघाटन केले जाणार होते. परंतु किरकोळ कामे बाकी असल्याने नव्याने ४ मार्च ही तारीख निवडण्यात आली. नागपूर आणि शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे 520 किमी लांबीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. तर शिर्डी आणि भरवीर (Samruddhi Mahamarg) दरम्यानच्या मार्गाचे उद्घाटन मे 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
१६ गावातून जातो मार्ग (Samruddhi Mahamarg)
समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २४.८७ किमी लांबीचा समावेश असून हा मार्ग एकूण १६ गावांतून जातो. त्यामध्ये पॅकेज १३मधील २३.२५१ व पॅकेज १४मधील १.६२१ किमी लांबीचा समावेश आहे. या टप्प्यात पॅकेज १३अंतर्गत २०० मीटर लांबीचा एक पूल, दारणा नदीवरील ४५० मीटर लांबीचा मोठा पूल, आठ छोटे पूल, वाहनांसाठी पाच भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी आठ भुयारी मार्ग, नऊ ओव्हरपास, तर पॅकेज १४अंतर्गत दारणा नदीवरील ९१० मीटर लांबीच्या महत्त्वाच्या पुलाचा समावेश आहे. प्रकल्पाच्या या टप्प्याचा (Samruddhi Mahamarg) खर्च १०७८ कोटी रुपये आहे.
शेतमालाची वाहतूक होणार सोपी
तिसरा टप्पा खुला झाल्यास इगतपुरी आंतरबदलाद्वारे ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी परिसरातील (Samruddhi Mahamarg) शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्या-जाण्यासाठी कमी कालावधी लागेल, असे एमएसआरडीसी म्हटले आहे.