Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाला जोडणार आणखी एक शहर; कोणाला होणार फायदा?

Samruddhi Mahamarg
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg । मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या विस्ताराचे काम सुरु आहे. मराठवाडा, विदर्भासाठी गेमचेन्जर ठरत असलेल्या या समृद्धी महामार्गामुळे प्रवास अगदी सोप्पा आणि जलद झाला आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा समृद्धी महामार्ग देशातील एक महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातोय. आता महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर समृद्धी महामार्गाला जोडलं जाणार आहे. पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्गाला जोडणारा आणखी एक महत्त्वाचा रस्ता निर्माण करण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे.

पुणे ते शिरुर राष्ट्रीय महामार्गावरील 53.4 किमी अंतरातील चार पदरी आणि सहा पदरी उन्नत महामार्गासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव सहा पदरी रस्ता निर्मितीला (Samruddhi Mahamarg ) मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या नवीन प्रोजेक्टमुळे पुणे, शिरूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक क्षेत्रांना थेट समृद्धी महामार्गाची जोड मिळणार असून, औद्योगिक वाहतूक आणि प्रवास अतिशय सोप्पा आणि जलद होणार आहे.

शेंद्रा–बिडकीन औद्योगिक पट्ट्यास मोठा फायदा – Samruddhi Mahamarg

या नव्या रस्त्यामुळे शेंद्रा–बिडकीन औद्योगिक पट्ट्यास मोठा फायदा होणार आहे. पुणे ते शिरूरदरम्यान औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात असल्याने साहजिकच आगामी काळात येथील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे ही उन्नत वाहतूक व्यवस्था तातडीने उभी करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. यासाठी हे काम तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. 6 पदरी रस्त्यांच्या काम आणि भूसंपादनाला तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.