मेहकर । महाराष्ट्रातील मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मात्र, या कामामुळं महामार्गावरील गावांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे. मेहकर तालुक्यातील समृद्धि महामार्गाच्या कामामुळे 5 गावांचा विद्युत पुरवठा खंडित आहे. तालुक्यातील साब्रा, फर्दापुर, कंबरखेड, गौढाळा, व कल्याना या पाच गावातील समृद्धी महामार्गावरील कामामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात आला आहे.
विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतातील पिकांचं पाण्याविना नुकसान होत आहे. पाच गावातील ग्रामस्थ पाण्यापासुन वंचित असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावरील कच्च्या रस्त्यावर मोटरसायकली आडव्या लावून रास्ता बंद केला. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या तसेच समृद्धी ठेकेदारकडे सुद्धा कित्येक वेळा गेले असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
त्यामुळे आता नाईलाजाने ग्रामस्थांनी महामार्गाचे काम बंद करत रस्ता अडविला आहे. जो पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत सुरु केला जात नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच शेतातील पिकांचे पाण्याविना झालेल्या नुकसानाची भारपाई देण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’