हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल कंपनी सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन गॅलेक्सी F14 5G लाँच करण्याची घोषणा केली आली. अतिशय खास फीचर्सनी सुसज्ज असलेलया या मोबाईलची सुरुवातीची किंमत 12,990 रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या 30 मार्चपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकता. आवाज आपण जाणून घेऊया या मोबाईलचे खास फीचर्स ….
फीचर्स –
Samsung Galaxy F14 5G मध्ये 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला Exynos 1330 चिपसेट देण्यात आला आहे, 5nm प्रोसेसरसह या सेगमेंटमध्ये येणारा हा एकमेव मोबाईल आहे. कंपनीने या मोबाईलला 25W चार्जिंग सपोर्टसह 6000mAh ची दमदार बॅटरी दिली. त्यामुळे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 2 दिवस तरी हा मोबाईल सहज चालू शकेल.
50MP कॅमेरा –
Samsung Galaxy F14 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो आहे. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल साठी यामध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
किंमत-
मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy F14 5G च्या 4GB+128GB व्हेरिएन्टची किंमत 12,990 रुपये आहे तर 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 14,490 रुपये ठेवण्यात आली आहे. 30 मार्चपासून या मोबाईलच्या विक्रीला सुरुवात होईल. सॅमसंगचा हा मोबाईल Flipkart, Samsung.com, याशिवाय काही निवडक स्टोअर्सवर देखील उपलब्ध असेल. तुम्ही हा मोबाईल ब्लॅक, ग्रीन आणि पर्पल रंगात खरेदी करू शकता