Samsung Galaxy M55 5G : 50 MP फ्रंट कॅमेरासह Samsung ने लाँच केला नवा स्मार्टफोन; किंमत किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samsung Galaxy M55 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Samsung ने जागतिक बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Samsung Galaxy M55 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये ग्राहकांना 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून या मोबाईलच्या लॉन्चिंगची चर्चा होती. अखेर आज कंपनीने हा मोबाईल ब्राझील मध्ये लाँच केला आहे. आज आपण सॅमसंगच्या या स्मार्टफोनचे खास फिचर आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात..

6.7 इंच डिस्प्ले –

Samsung Galaxy M55 5G मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंच AMOLED Plus डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1000 nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने या मोबाईल मध्ये Snapdragon 7 Gen 1 चिपसेट बसवली असून हा स्मार्टफोन Android 14 वर काम करतो. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधाही देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.

50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा – Samsung Galaxy M55 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy M55 5G मध्ये पाठीमागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप बसवण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फी साठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी 5000 mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, Samsung Galaxy M55 5Gची किंमत BRL 2,699 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 45,000 रुपये आहे. हा मोबाईल लाइट ग्रीन आणि डार्क ब्लू रंगात ग्राहक खरेदी करू शकतात.