Samsung Galaxy S25| सॅमसंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सॅमसंगने आपल्या बहुप्रतिक्षित Galaxy S25 सीरीजचा भारतात अधिकृत लाँच केला आहे. या सीरीजमध्ये तीन मॉडेल्स आहे. ज्यात Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra यांचा समावेश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन लॉन्च झाल्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी उत्सुकता वाढली आहे.
फीचर्स आणि डिझाईन
Galaxy S25 आणि S25+ हे अनुक्रमे 6.5-इंच आणि 6.7-इंचाच्या Dynamic AMOLED 2X डिस्प्लेसह येतात. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,600 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. S25 Ultra मॉडेलमध्ये 6.9-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. या तिन्ही फोन्सच्या संरक्षणासाठी Corning Gorilla Glass Victus 2 वापरण्यात आला आहे. जो अधिक टिकाऊ आणि स्क्रॅच-प्रूफ आहे.
सॅमसंगच्या सर्व मॉडेल्समध्ये नवीनतम Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर वापरण्यात आला आहे, जो वेगवान आणि कार्यक्षम परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. सॅमसंगने या सीरीजसाठी Android 15 आधारित One UI 7 ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला आहे. खास म्हणजे, कंपनीने सात वर्षे सतत OS आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
Samsung Galaxy S25 कॅमेरा
फोटोग्राफीच्या दृष्टीने Galaxy S25 आणि S25+ मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड आणि 12MP टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे. Galaxy S25 Ultra मध्ये मात्र 200MP मुख्य सेन्सर, 50MP अल्ट्रावाइड, 50MP टेलीफोटो (5x झूम) आणि 10MP टेलीफोटो (3x झूम) यांचा समावेश आहे. सर्व मॉडेल्समध्ये 12MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. जो सेल्फीसाठी ही उत्कृष्ट आहे.
Samsung Galaxy S25 बॅटरी आणि चार्जिंग
Galaxy S25 मध्ये 4,500mAh, S25+ मध्ये 4,800mAh, तर S25 Ultra मध्ये 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहे. हे तिन्ही फोन्स 45W फास्ट चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सारख्या तंत्रज्ञानाला सपोर्ट करतात. जे वापरकर्त्यांना दिवसभर पुरेल अशी बॅटरी क्षमता देतात.
Samsung Galaxy S25 किंमत
भारतात Galaxy S25 ची सुरुवातीची किंमत 80,999, S25+ ची 99,999 आणि S25 Ultra ची 1,29,999 अशी आहे. सध्या प्री-बुकिंगसाठी हे फोन उपलब्ध झाले असून खरेदीदारांना काही खास ऑफर्स देखील मिळत आहेत.
खास म्हणजे, सॅमसंगच्या या सीरीजमध्ये Galaxy AI तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हा फोन वापरकर्त्यांच्या सवयी जाणून त्यानुसार स्मार्ट सुविधा प्रदान करतो. ‘Now Brief’ आणि ‘Night Video with Audio Eraser’ यांसारख्या AI-आधारित फिचर्स यामध्ये आहेत. अशा खास फीचर्समुळे हा स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.




