20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय Samsung चा फोल्डिंग वाला Mobile; कुठे आहे ऑफर?

samsung galaxy z flip 3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SAMSUNG Galaxy Z Flip3 5G या फोल्डेबल मोबाईल बाबत तुम्ही ऐकलं असेल आणि असा मोबाईल आपल्याकडे सुद्धा असावा असेही तुम्हाला वाटत असेल. परंतु मोबाईलच्या महाग किमतीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना हा मोबाईल खरेदी करणं तस मुश्किलच … परंतु आता या मोबाईल खरेदीवर बंपर डिस्काउंट मिळत असून अवघ्या 20 हजारापेक्षा सुद्धा कमी किमतीत तुम्हाला हा जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. चला या ऑफर बद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया…

कंपनीने SAMSUNG Galaxy Z Flip3 5G (8GB RAM, 128GB स्टोरेज) हा मोबाईल 95,999 रुपये किमतीमध्ये लाँच केला होता. परंतु सध्या सुरु असलेल्या Flipkart Big Saving Days सेलमध्ये हाच मोबाईल तुमच्यासाठी 44,999 मध्ये उपलब्ध आहे. तसेच हा मोबाईल खरेदी करताना ग्राहक विविध बँक ऑफर्सचाही लाभ घेऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅमसंगच्या या फोल्डेबल मोबाईल वर 26,250 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना मोबाईल असेल तर त्याबदल्यात तुम्हाला 26,250 रुपयांपर्यंत सूट मिळतेय. या एकूण सर्व ऑफरनंतर अवघ्या २० हजारांपेक्षा सुद्धा कमी किमतीत तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकता.

काय आहेत SAMSUNG Galaxy Z Flip3 5G चे फीचर्स –

SAMSUNG Galaxy Z Flip3 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED फोल्डेबल डिस्प्ले देण्यात आला आहे. या डीस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. मोबाईल मध्ये 1.9-इंचाचा कव्हर डिस्प्ले सुद्धा आहे, ज्याचा उपयोग नोटिफिकेशन, इनकमिंग कॉल इत्यादी पाहण्यासाठी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनला Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी मोबाईल मध्ये 12MP मुख्य कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूस 10MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोबाईल खरेदीसाठी – Click Here