सांडगे

Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली | उन्हाळ्यात पापड, कुरडया असे अनेक पदार्थ बनविले जातात. त्याच बरोबर सांडगे हे देखील उन्हाळ्यात बनविले जातात. सांडगे वेगवेगळ्या डाळींपासून बनविले जातात. आपल्या आवडी प्रमाणे डाळींचा वापर यात आपण करू शकतो. सांडग्यात डाळी वापरल्यामुळे हे पौष्टिक तर असतातच पण डब्यात नेण्यासाठी याची भाजी झटपट बनते.

साहित्य –

१) अर्धा किलो चणा डाळ
२) १ वाटी मटकीची डाळ
३) १ वाटी उडीद डाळ
४) १ वाटी मूग डाळ
५) २-३ चमचे लाल तिखट
६) हळद
७) मीठ
८) जिरे
९) कोथिंबीर

कृती –

सर्व डाळी चांगल्या पाण्याने धुऊन घ्याव्यात. नंतर रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात. सकाळी त्यात जिरे घालून जाडस वाटून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, मीठ, हळद आणि कोथिंबीर घालून पीठ करून घ्या. याचे छोटे छोटे सांडगे प्लॅस्टिकच्या कागदावर घालावेत व चांगले वाळेपर्यंत उन्हात ठेवावेत. वाळल्यावर या सांडग्याची भाजी करावी.

( टीप – डाळींचे प्रमाण आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता.)

इतर पदार्थ –

कारल्याचे चिप्स

नारळी भात

नारळाचे लाडू