सांगली प्रतिनिधी । व्हॅलेंटाईन डे साठी दिल्ली व मुंबईत डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्याप्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणीमुळे डच गुलाबाचा दर चांगलाच वधारला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी हरितगृहातील गुलाबाच्या फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे मिरजेतून दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूला रेल्वेने फुलांची निर्यात सुरू आहे.
दररोज पाठविण्यात येणाऱ्या गुलाबाच्या फुलांचा दिल्ली व मुंबईत शीतगृहात साठा करण्यात येतो. थंड हवामानामुळे जानेवारी अखेरपासून दिल्लीला फु ले पाठविण्यात येत आहेत. व्हॅलेंटाईन डेमुळे एरवी पाच रुपये दर असलेल्या लाल रंगाच्या डच गुलाबास पंधरा ते वीस रुपये दर मिळत आहे. मिरजेतून दररोज सुमारे दोनशे बॉक्स गुलाबाची फुले दिल्लीला जात आहेत. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलाचे उत्पादन होत नसल्याने अन्य शहराच्या तुलनेत मागणी व दर जास्त असल्याने दिल्लीला गुलाबाच्या निर्यातीचे प्रमाण मोठे आहे.
निजामुद्दीन एक्स्पे्रसमधून दररोज जयसिंगपूर व शिरोळ परिसरातील हरितगृहातील फुले दिल्ली मुंबईला जात आहेत. व्हॅलेंटाईन डेमुळे फुलांचा दर वधारला असून डच गुलाबास दहा रुपये दर मिळत आहे. मात्र प्रत्येकी चारशे फुले असलेल्या बॉक्सचा आकार मोठा असल्याने फुलांच्या बॉक्सला आकारमानाप्रमाणे १६० रूपये आकारणी करण्यात येते. रेल्वे मालवाहतूकीत भाडेवाढीमुळे फुलांची निर्यात महागली आहे. फुलांचे दर घटल्याने हवालदिल फुले उत्पादक शेतकऱ्यांना व्हेलेटाईन डेचा आधार मिळाला आहे. व्हॅलेंटाईन डेमुळे स्थानिक बाजारातही गुलाबाचा दर प्रति शेकडा १०० रुपयावरुन ३०० रुपयावर पोहचला आहे. जरबेरा व कार्नेशिया या फुलांचे दरही वाढले आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.