आपापली मुलंबाळं, जनावरं घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा; जयंत पाटील यांचे आवाहन

0
58
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून अतिवृष्टी आली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका निर्माण झाला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली असून महापुराचा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे कृष्ण खोऱ्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी स्थलांतरित व्हावं असे जयंत पाटील यांनी म्हंटल.

जयंत पाटील म्हणाले, मला जाणीव आहे, आपल्या सर्वांची मोठी आबाळ होईल पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही. सांगलीतही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तिथल्या प्रशासनालाही ताबडतोब हालचाली कराण्याचा सुचना दिल्या आहेत. धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. असे जयंत पाटील यांनी म्हंटल.

 

प्रशासन,लोकप्रतिनिधींच्या मी सातत्याने संपर्कात आहे.एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावं. पश्चिम महाराष्ट्राने असे अनेक संकट पाहिले आहे. आपण या संकटालाही तोंड देऊ असा मला विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here