Biocon Q1 Results : बायोकोनचा निव्वळ नफा पहिल्या तिमाहीमध्ये 35% खाली आला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली देशातील सर्वात मोठी फार्मा कंपन्यांपैकी एक असलेल्या बायोकोनने चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीने म्हटले आहे की,” 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत त्याचा एकत्रित निव्वळ नफा 35.39 टक्क्यांनी घसरून 108.4 कोटी रुपये झाला.”

कंपनीने म्हटले आहे की,”निव्वळ नफ्यातील ही घट सहयोगी स्टार्टअप संस्था Bicara Therapeutics Inc. मधील तोट्यामुळे झाली.” गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 167.8 कोटी रुपयांचा नफा झाला असल्याचे बायकॉनने गुरुवारी उशिरा शेअर बाजाराला सांगितले.

किरण मजुमदार शॉ यांनी निव्वळ नफा कमी होण्याचे कारण स्पष्ट केले

मागील तिमाहीत कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू 1,807.8 कोटी रुपये होता, जो मागील वर्षातील याच कालावधीत 1,712.1 कोटी होता. बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मजुमदार शॉ म्हणाल्या की,”Bicara Therapeutics मधील कोरोना महामारीमुळे ऑपरेशन्सवर परिणाम आणि तोटा प्रभावित झाल्यामुळे निव्वळ नफ्यात घट झाली आहे.”

अलीकडेच SEBI ने इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात बायोकॉनच्या अधिकाऱ्यावर बंदी घातली होती

अलीकडेच मार्केट रेग्युलेटर सेबीने फार्मास्युटिकल कंपनी बायोकॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीहास तांबे यांना अंतर्गत व्यापार नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिक्युरिटीज मार्केटमध्ये तीन महिन्यांपासून ट्रेडिंग करण्यास बंदी घातली होती. यासह तांबे याना दंड देखील भरावा लागेल.

Leave a Comment