सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळ
दोघे परप्रांतीय घरफोडी करून पलायन करीत असता स्थायिक नागरिकांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. किरण मनोहर भवर ( वय 25 ) आणि मेहरसिंग रामसिंग गुंदड ( वय 24 दोघे रा. खनिंबा ता. कुक्षी जिल्हा धार ) अशी या संशयित आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयित दोघे परप्रांतीय आरोपी मध्यप्रदेश मधून सांगली जिल्ह्यमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. या दोघांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धामणी रोडवर असणाऱ्या इरसेड भवन जवळील सिद्ध वलभ कृपा अपाटमेट फ्लॅट नं.102 मधील एक बंद फ्लॅटच्या ग्रील चे दरवजाचे आणि मुख्य प्रवेश दरवजाचे लॉक कटरने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्याचा लक्ष्मीहार, टिक्का, चार बिलव्हर, पाच अंगठ्या, एक गंठण, तीन सोन्याच्या अंगठ्या, चार जोड कर्णफुले, एक चांदीचे मोठे ताट, एक लहान ताट, फुलपात्र , लहान वाठ्या, आरतीचे ताट, मोट्या वाट्या, मोठे करंडक, दोन लहान करंडक, पळी, पंचपात्र, दोन आरत्या, दोन घंट्या, अत्तर दाणी, छन्ना, धुपआरती, लहान चमचा, उदबत्ती स्टॅङ, चांदीचे चार कईन आणि रोख रक्कम १ लाख ६० हजार असा एकूण ५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल चोरुन घेतला होता. हे दोघे सुरक्षा भिंती वरून उडी मारून जात असता, आजूबाजूच्या नागरिकांनी या दोघा चोरट्याना पाहिले, नागरिकांनी त्या दोघा चोरट्याचा पाठलाग केला. या दोघा संशयित आरोपींनी पळून जाण्यासाठी अंकली येथील नदी मध्ये उडी मारली. त्यांनी पोहून नदी पार केली मात्र त्या दोघा चोरट्याना नागरिकानी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या दोघा संशयित आरोपींच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. परप्रांतीय घरफोडी करणाऱ्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शकता सहा पोलीस निरीक्षक अमित पाटील यांनी वर्तवली असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
या बातम्याही वाचा –
वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
महिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली; पहा व्हिडीओ
धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा