सांगली प्रतीनिधी । तासगाव तालुक्यातल्या लोढे गावात एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्न सोहळ्यासाठी वरातीच्या डामडौलाला टाळत नवरदेव चक्क बैलगाडीतून थेट लग्नमंडपात दाखल झाला. बडेजावपणाला फाटा देत शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या बैलगाडीतून मंगलकार्यालयात दाखल झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोढे गावच्या मनोज ठोंबरेच नुकतंच पेडच्या अश्विनी शेंडगेशी लगीन ठरलं. मनोज सांगलीच्या पाटबंधारे विभागात लिपिक टंकलेखक म्हणून शासकीय नोकरीत. पण मनोज मूळचा शेतकरी. मातीला पाय लावणारा आणि बैलांवर प्रचंड प्रेम करणारा. दारात देखणी बैलजोडी होती. सकाळपासून घरात लगीनघाई होती. तासगाव भिवघाट रोडला चिचणीच्या सागर मंगल कार्यालयात लग्नसमारंभ होता. कार्यालय घरापासून पाच किलोमीटर अंतरावर होत. कार्यालयात जाण्यासाठी त्यांनी बैल चकाचक धुतले, गुलाल टाकला.
सकाळी नऊच्या दरम्यान लग्नाला जायाला गावातली मानस त्याच्या घराकडं याला लागली. मनोज घरच्यांना म्हणाला मी बैलगाडीतून लग्नाला येणार आहे. हे ऐकल्यावर सर्वांना आश्चर्य वाटलं. सजला धजल्याला मनोज आपल्या बैलगाडीत बसला. कासर हातात धरलं आणि उभं राहून वरात निघाली. नवरा बैलगाडीतून येत असलेल पाहून माणसांना आश्चर्य वाटलं. अर्धा पाऊण तासात नवरदेव कार्यालयात आला आणि दोनच्या मुहूर्तावर तांदूळ पडत विवाहबंधनात आडकला. सगळ्या कार्यालयात यावेळी बैलगाडीचीच चर्चा झाली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.