व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून कराड बसस्थानक व कॉटेज हॉस्पिटलला सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहर व भागातील महिलांसाठी एक अनोखं अभियान ‘लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र’ यांच्या माध्यमातून कराड शहरात राबविण्यात आले. कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालय व कराड बस स्थानक परिसरामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन अँड इनसिनरेटर मशीन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करण्यात आला. या अभियानाचे उदघाटन आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एम.जे.एफ.एल.एन.सुनील सुतार, जमदग्नी, एल.एन.भोजराज, नाईकनिंबाळकर सर, आर.सी. एल.एन. फडतरे, तसेच या क्लब चे एल.एन. साळुंखे सर, भोंगळे सर , कोरे , डॉ शिंदे सर , डॉ महेश खुस्पे , ऍडव्होकेट सतीश पाटील, सिकची, अरुण देसाई, राजेश शहा, यादव, कलबुर्गी, यादव. सौ. आशा चव्हाण, सौ मंगल चव्हाण, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, प्रदिप दड्डा, अशोक दड्डा आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी सौ. गौरी राहुल चव्हाण म्हणाल्या कि, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सोयीसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि इनसिनरेटर मशीन उभारणे गरजेचे असल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला व यामुळे हे मशीन कराड उपजिल्हा रुग्णालय व कराड बस स्थानक येथे उभारण्यात आले. या मशीन मधून महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळू शकतील तसेच वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स अनेकदा डस्टबिनमध्ये किंवा उघड्या वर टाकले जातात. हे पॅड सुद्धा या मशीन मध्ये टाकले जाऊ शकतात त्याची पूर्ण विल्हेवाट या मशीनमध्ये होते. त्यामुळे स्वच्छता राखण्यास मदत होईल.

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, लायन्स क्लब कडून समाजोपयोगी अनेक विविध उपक्रम राबविले जातात. यामधीलच एक हा उपक्रम जो या संस्थेकडून मांडण्यात आला. महिलांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा उपक्रम लायन्स क्लब ने हाती घेतला व या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि इनसिनरेटर मशीन साठी मी निधी उपलब्ध करून दिला. मतदारसंघात अनेक गोष्टींसाठी विकासनिधी उपलब्ध करून देता येईल. यावेळी लायन्स क्लब च्या मान्यवरांची भाषणे झाली.