पुणे | भाजपाचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील जागा लढवणार असल्याची माहिती दिली. दरम्यान भाजपा मलाच तिकिट देईल असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. तसेच मीच पुण्याचा भावी खासदार होणार असल्याचे घोषणा संजय काकडे यांनी यावेळी केली आहे.
संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यात पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यात संजय काकडे अनुपस्थित होते. यावर पुण्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं नाही म्हणून गेलो नाही, असे काकडे यांनी सांगितले.
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्याच्या निकालानंतर संजय काकडे यांनी धर्म, राममंदिर, शहरांची नामकरणे, पुतळे आदींचे राजकारण सोडून भाजपने नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंड्याच्या मार्गावर चालावे अशा शब्दांत भाजपला घरचा आहेर दिला होता .
पुण्यातील वाडेश्वर कट्टयावर पुण्याचा भावी खासदार कोण? यावर चर्चासत्राचे योजना करण्यात आले होते. यावेळी संजय काकडे, मोहन जोशी, बाबू वागसकर, राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आदी नेतेमंडळी उपस्थित होती.
इतर महत्वाचे –
इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी
भीम आर्मी च्या सभेला परवानगी देऊ नका – मिलिंद एकबोटे
भारतीय लष्करातून पळून जाऊन तो अतिरेक्यांना मिळाला आणि आज मारला गेला
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि असे हटके व विशेष लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.