संजय केनेकर यांची कोरोना परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांनी मराठवाड्यातील कोरोना परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असल्याने सरकारकडून औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनीं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावरही जोरदार टीका केली.

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. सरकारमधील मंत्री असे बेजबादारपणे कसे वागू शकतात. राजेश टोपे हे एका जिल्ह्याचे नाही तर संपुर्ण राज्याचे आरोग्य मंत्री आहेत. सरकारमधील मंत्री आपापल्या जिल्ह्यांना प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत सरकारकडून काहीच उपाय योजना केल्या जात नसल्यची टीका त्यांनी यावेळी केली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे आपल्या जिल्ह्यात इंजेक्शन नेत असल्याचा व इतर जिल्ह्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप केणेकर यांनी यावेळी केला. त्यामुळे इंजेक्शनचा साठा आल्यानंतर त्याचे वाटप गरजेनूसार झाले पाहिजे. मंत्र्यांनी अशा पद्धतीने वर्तन करणे त्यांना व त्यांच्या पदाला न शोभणारे आहे. ही गरज लक्षात घेऊन शहरात इंजेक्शनचा पुरवठा केला गेला पाहिजे. काही जिल्ह्यात अतिरिक्त साठा असेल तर तो दुसऱ्या जिल्ह्याला दिला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले .

Leave a Comment