खा. संजय पाटलांसह ‘या’ ७ नेत्यांचा मंत्रिपदाचा ‘दर्जा’ काढला ; महामंडळावरील नियुक्त्याही मुख्यमंत्र्यांनी केल्या रद्द

1
83
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । राज्यातील ‘भाजपा’ सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपा आणि जनसुराज्य शक्ती पक्षातील सात नेत्यांचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. खासदार पाटील वगळता अन्य नेत्यांना ‘माजी’ लावण्यापुरताच या नियुक्त्यांचा लाभ झाला. या यादीत दिनकर पाटील, नीता केळकर, शिवाजी डोंगरे, वैभव शिंदे, विक्रम पाटील आणि समीत कदम यांचा समावेश आहे.

दरम्यान राज्यात ‘भाजपा’ला विरोधी बाकावर बसण्याचा वेळ आल्याने या मंडळींची महामंडळावरील नियुक्ती रद्द होणार, हे निश्चित झाले होते. त्याचा निर्णय आज घेण्यात आला. खासदार संजय पाटील यांचा सिंचन योजनांसाठीचा प्रचंड आग्रह लक्षात घेऊन तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षापूर्वी त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी केली होती. त्यावेळी या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. वास्तविक हे पद शिवसेनेच्या कोट्यात होते.

त्यामुळे सेनेने नितीन बानुगडे पाटील यांनाही उपाध्यक्ष केले होते. अशावेळी आपला वरचष्मा दाखवण्यासाठी संजयकाकांना ‘कॅबिनेट’चा दर्जा देत फडणवीसांना कडी केली होती. निवडणुकीच्या विजयानंतर देखील पुन्हा त्यांच्याकडे पद आणि कॅबिनेटचा दर्जा कायम राहिला होता. मात्र आता ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

1 COMMENT

  1. निबळक ता.तासगांव जि.सांगली …निबळक व आंधळी मध्ये येराऴ नदीपञातुन GCB न व डंपर वाळु उपास चालु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here