19 डिसेंबरला मोठा स्फोट, अंधभक्त कोमात जाणार; पृथ्वीबाबांच्या दाव्याला राऊतांची सहमती

sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 19 डिसेंबरला संपूर्ण जगात एक मोठा राजकीय भूकंप होईल. त्याचे पडसाद आपल्या भारतावर पाहायला मिळेल आणि एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल असं मोठं भाकीत काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. भाजपने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. मात्र आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत याना याबाबत विचारलं असता राऊतांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याला दुजोरा दिला . काहीतरी मोठा स्फोट 19 तारखेला होणार आहे, या गौप्यस्फोटानंतर अंधभक्त कोमामध्ये जाणार, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीत तज्ज्ञ असून त्यांनी अनेक स्तरांवर काम केले आहे. ज्यामुळे त्यांना याबाबतची अधिकची माहिती आहे. १९ डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतासंदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. खासकरून पंतप्रधान मोदी आणि भाजपाबाबत हि माहिती असणार आहे अशी चर्चा अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कायमचं कोमात पाठवणारी माहिती आहे. त्यानंतर जी फजिती भाजपा नेत्यांची होणार आहे त्यामुळे त्यांना सत्तेत राहता येणार नाही असे संजय राऊत यांनी म्हंटल.

पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीत तज्ज्ञ असून त्यांनी अनेक स्तरांवर काम केले आहे. त्यामुळे त्यांना याबाबतची अधिकची माहिती आहे. त्यामुळेच आज कोणीतरी म्हणत असेल की अमित शहांना 102 ताप आला आहे, काहीतरी मोठा स्फोट 19 तारखेला होणार आहे म्हणूनच भाजपाच्या सर्व खासदारांना दिल्लीत थांबण्यास सांगण्यात आले असून व्हीप जारी झाला आहे आणि सध्या धावाधाव सुरू आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते ?

अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केले आहेत , आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला कल्पना नाही, पण अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच यामुळे एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. जो देशाचा नवा पंतप्रधान असेल तो काँग्रेसचा नसेल कारण आमच्याकडे काही बहुमत नाही असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते.